मासिक पाळी व्यवस्थापना बाबत महिलांमध्ये  जागरूकता  असणे गरजेचे – विवेक भीमनवार

महिलांनी गिरवले मासिक पाळी व्यवस्थापनाचे धडे

ठाणे –  भारतात साधारणतः ६० कोटी महिला राहत असल्या तरी यातील केवळ १७ महिलांमध्ये मासिक पाळी बाबत जागरूकता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक महिला सक्षमीकरणाची पायरी चढत असताना मासिक पाळी बाबत जागरूक असणे काळाची गरज असल्याचे मत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी व्यक्त केले. स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जि.प. ठाणे यांच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्वच्छता व पाणी ) मानसी बोरकर , शिक्षणाधिकारी मींना यादव उपस्थित होत्या.

पुढे भीमनवार म्हणाले, ज्या देशांनी महिलांच्या प्रगतीसाठी दार खुली करून दिलीत ते देश आज प्रगती करताना दिसत आहेत. महिला या मूळताच सक्षम आहेत. मात्र सक्षमीकरणाच्या नावाखाली त्यांच्यावर भार टाकू नये असेही ते म्हणाले. केवळ महिलांची शैक्षणिक ,आर्थिक  प्रगती झाली म्हणजे त्या सक्षम झाल्या असे म्हणता येणार नाही. त्यांना सर्व क्षेत्रात मानाचे स्थान मिळणे गरजेचे आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. वर्ड इकॉनॉमिक  फोरमच्या अहवालानुसार पुढच्या १० वर्षात ज्या कंपन्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त असेल त्या कंपन्या भरभराटीला जातील असा अहवाला  सांगतो. त्यामुळे महिलांची प्रगती देशाची प्रगती असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहापूर येथील जिंदाल कंपनीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने बचतगट महिला ,अंगणवाडी वाडी सेविका , गावातील ग्रामस्थ महिला आदी महिलांवर्ग सहभागी झाल्या होत्या. त्यांना डॉ. तरुलता धानके यांनी मासिक पाळी व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) मानसी बोरकर म्हणाल्या , मासिक पाळी व्यवस्थापना विषयीच्या दृष्टीकोनात व वर्तमानात बदल घडवून आणणे व त्यांना प्रोत्साहित करणे हा कार्यशाळेचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  या कार्यशाळेचे सूत्रसंचालन विद्या शिर्के यांनी केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email