मासिक उत्पादन अहवाल सप्टेंबर 2018
नवी दिल्ली, दि.२३ – सप्टेंबर 2018 मध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन 2797.84 टीएमटी एवढे झाले. निर्धारित उद्दिष्टापेक्षा ते 6.59 टक्के तर सप्टेंबर 2017 च्या तुलनेत 4.19 टक्के कमी आहे.
सप्टेंबर 2018 मध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन 2684.20 एमएमएससीएम झाले. महिन्यासाठी निर्धारित उद्दिष्टापेक्षा ते 7.56 टक्के तर सप्टेंबर 2017 च्या तुलनेत 1.43 टक्के कमी आहे.
सप्टेंबर 2018 मध्ये रिफायनरी उत्पादन (कच्च्या तेलावरील प्रक्रियेसंदर्भात) 20851.41 टीएमटी झाले. ते महिन्यासाठी निर्धारित लक्ष्याच्या 2.18 टक्के अधिक असून सप्टेंबर 2017 च्या तुलनेत 1.28 टक्के अधिक आहे.
Please follow and like us: