मालमत्ता कर,पाणी बिल भरण्याकरिता सुट्टीच्या दिवशीही ठामपाची प्रभाग कार्यालये सुरु

ठाणे –  सन २०१७ -१८ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर व पाणी बिल वसुलीचा इष्टाकं दिनांक ३१ मार्च पर्यत पूर्ण करण्यासाठी तसेच महापलिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कराची, व पाणी बिलाची थकबाकी भरणे सोयीचे होण्याकरिता ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग कार्यालये दिनांक २६ मार्च २०१८ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत कार्यन्वित ठेवण्यात येणार आहेत.सुट्टीच्या दिवशीही सदरची कार्यालये सुरु राहणार असल्याने नागरिकांनी सन २०१७ –१८ या आर्थिक वर्षातील आपला मालमत्ता व पाणी बिल तात्काळ भरून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन ठाणेमहानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.