मालकाला दोन लाख ५३ हजारांचा गंडा
कल्याण – सी ए ला देण्यासाठी मालकाने विश्वासाने दिलेली दोन लाख ५३ हजारांची रोकड नोकराने लंपास केल्याची घटना कल्याणात उघडकीस अली आहे या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात रमेश सरोज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मुंबई मुलुंड येथे राहणारे ऋषभ गडा याच्या कडे डोंबिवली येथे राहणारा रमेश सरोज हा काम करत होता सोमवारी ऋषभ यानि रमेश सी ए ला देण्यासाठी २ लाख ५३ हजार रुपये रोख रक्कम दिली मात्र रमेश याने ती सी ए न देता तो रोकड घेवून पळून गेला .गडा याने रमेश चे घर गाठले मात्र त्याच्या घराला टाळे असल्याने त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी रमेश सरोज विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: