मानसीक रुग्ण तरुणाने , रस्त्याने जाणाऱ्या मुलीच्या डोळ्यात टाकली मिरची पुड

(म.विजय)

ठाणे – दिनांक 25/04/2018 रोजी ठाणे परिसरात राहणारी 16 वर्षीय तरुणी ही चरई येथील ही डान्स क्लासमधुन घरी एकटी पायी चालत जात असताना एका तरुणाने 8:15  वाजताच्या सुमारास तिच्या समोरून येऊन तिच्या डोळ्यात मिरची पुड टाकुन पळुन गेला , त्या अनपेक्षित हल्ल्याने व  तरुणीच्या डोळ्यात मिरची पुड गेल्याने ती जीवाच्या आकांताने ओरडून हाताने चेहरा झाकून रडु लागली , तिच्या रडण्याच्या आवाजाने बाजुस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी तिची अवस्था पाहुन पाणी आणुन दिले , तदनंतर तेथे जमलेल्या एकाने पोलीसांना बोलावल्याने ,  पोलीसांनी प्रथम येऊन त्या तरुणीला  उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले , या तरुणीने उपचारा नंतर नौपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली , त्या प्रमाणे पोलीस स्टेशन येथे कलम  354,354 ड (1),326  प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला  , या घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन सह आयुक्त मधुकर पांडे , पोलीस उपायुक्त डॉ .स्वामी , सहाय्यक पोलीस आयुक्त सायगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नौपाडा पोलीस स्टेशन चंद्रकांत जाधव यांनी या अनोळखी ईसमाचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक रासम , सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडारे , पोलीस उप निरीक्षक केकाणे व यादव पोलीस हवालदार अहिरे , चव्हाण , राठोड , चड्चणकर , अवताडे सावंत यांचे पथक तयार केले, या पथकाने यातील अनोळखी आरोपी ईसमाचा शोध घेण्या साठी घटना स्थळाच्या परिसरातील 70 ते 80 सीसीटीव्ही केमेराची पाहणी करून घटने दरम्यानचा कालावधीचे फुटेज पडताळले असता , घटनास्थळी असलेल्या एका इलेक्ट्रिक दुकानातील सीसीटीव्ही कँमेरा मध्ये यातील घटना कैद झाल्याचे दिसुन आले , तसेच तेथील परिसरातील इतर सीसीटीव्ही कँमेऱ्याची पाहणी करता घटनेतील ईसमाचा चेहरा स्पष्ट दिसून आल्याने त्याचा फोटो काढुन त्यानुसार ठाणे शहरातील सीदधेश्वर तलाव , खोपट , तलावपाळी , चंदनवाडी , ठाणे रेल्वे स्टेशन परिसर तसेच वागळे इस्टेट , वर्तक नगर , रोबोडी , कळवा , मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास केला असता , गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीनुसार मुंब्रा भागात राहणारा अब्दुल समद नुरमहंमद शाखानी वय 21 वर्ष राहणार नशेमन बिल्डिंग बी विंग , तिसरा मजला , रूम नंबर 303, तन्वरनगर , कौसा, मुंब्रा यास ताब्यात घेतले  , त्यास नौपाडा पोलीस ठाण्यात आणुन त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली , त्यानुसार 13/05/2018 रोजी 19:30 ला अटक करण्यात आली , त्याच्याकडे या गुन्हा बद्दल विचारले असता , त्याने काहीही कारण नसताना त्या तरुणीच्या डोळ्यात मिरची पुड टाकल्याचे सांगितले ,  घरच्यांनी मिरची पुड आणण्यासाठी सांगीतली असता त्याने दीड वाजता मिरची पुड विकत घेतली , त्या नंतर मासुंदा तलावामध्ये बोटींग केली , तीन चार तास ठाण्यामध्ये फिरल्यानंतर सात तासानंतर रात्री सवा आठ वाजता त्याने चरई येथे येऊन समोरून येणाऱ्या तरुणीच्या डोळ्यात मिरची पुड टाकली व दोन  तास फिरून घरी गेला त्यामुळे हा आरोपी  मानसीक रुग्ण असल्याचे जाणवत होते , या  तपासा मध्ये सीसीटीव्ही फुटेज मुळे आरोपीला ताब्यात  घेण्यात पोलिसांना फार मदत झाली , त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त सायगावकर यांनी नागरिकांना आव्हान केल आहे ,की  आपापल्या परिसरात सीसीटीव्ही कँमेरा लावावे ,  सीसीटीव्ही कँमेर लावल्यास , कुठल्याही प्रकारचे गुन्हे करून आरोपी पळुन गेले तरी सीसीटीव्ही फुटेज मुळे अशा आरोपींना पकडण्यास पोलीसांना मदत मिळते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email