मानसिक तणावाखाली विक्षिप्त वागणाऱ्या तरुणाने आईला केली हातोडीने मारहाण
डोंबिवली – मानसिक तणावाखाली असणार्या व विक्षिप्त वागणाऱ्या एका तरुणाने आपल्यावर आईवरच हातोडीने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे या [प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात आशुतोष ठाकूर या मनोरुग्णाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
डोंबिवली सोनारपाडा शंकर नगर बांगल्या दर्शन सोसायटी मध्ये राहणार्या अंजना ठाकूर यांचा मुलगा आशुतोष १९ हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असून विक्षिप्तपणे वागत होता .काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारस घरात बसले असताना अचानक आशुतोष ने हातोडीने आईवर हल्ला केला त्याने अंजना यांच्या तोंडावर चेहऱ्यावर हातोडीने मारल्याने त्या गंभीर जखमी झल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .तर या प्रकरणी आशुतोष विरोधात मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Please follow and like us: