मोबाईल वापरणारे चोर सीसीटीव्हीमुळे गजाआड,मानपाडा पोलिसांनी जप्त केलं पाच लाखांचा मुद्देमाल…
( श्रीराम कांदु )
डोंबिवली : कानाला मोबाईल लावून दिवसाढवळ्या घरफोडी करणा-या दोघांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केलीये. भोला जैस्वाल आणि कुलदीप यादव अशी त्यांची नावं आहेत.
जानेवारी महिन्यापासून मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात घरफोडीचे प्रकार घडले होते. यातल्या चोरट्यांची कानाला मोबाईल लावून काम करण्याची मोडस ऑपरेंडी पोलिसांनी हेरली. याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज हाती आल्यानंतर तब्बल ६ महिने मग काढून पोलिसांनी या दोघांना पालघर जिल्ह्यातून अटक केली. या दोघांपैकी एकजण बिल्डींगखाली टेहळणी करत उभा राहायचा, तर दुसरा घरफोडी करायचा. यादरम्यान हे दोघेही आपापसात मोबाईलवर संपर्कात असायचे. अचानक कुणी आलंच, तर घरात गेलेल्या साथीदाराला त्याचा दुसरा साथीदार सावध करायचा. या पद्धतीनं चोरी करण्याची ही पहिलीच पद्धत असून पोलिसांनी त्यांच्याकडून तीस तोळे सोनं, चांदी आणि रोख्राक्कम असं एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.