मानपाडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांंची गावात मिरवणूक

डोंबिवली , दि. १५ -एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळांना गळती लागली असता दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तम शिक्षण असल्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे स्वागत केले जात आहे. डोंबिवलीजवळील मानपाडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या १५ विद्यार्थ्यांची गावात मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे २७ गावामधील या शाळेत ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे.

   मानपाडा येथील शाळेत १ ली इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या गावातील १५ विद्यार्थ्यांचे ढोलताश्या व लेझीमच्या जल्लोषात चार चाकी गाडीत बसवून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नगरसेविका दमयंती वझे , माजी पोलीस पाटील बुधाजी वझे, पार्वतीबाई ठाकूर, पंचायत समिती शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, , बीट विस्तार अधिकारी प्रेरणा नेवगी, शाळेतील विद्यार्थी वर्ग, पालकवर्ग , शिक्षकवर्ग उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गांधी टोपी घालून `माझी शाळा- जिल्हा परिषद शाळा मानपाडा` अशी घोषणाबाजी केली. सुज्जज इमारत, भव्य मैदान, सजवलेल्या आणि आकर्षक वर्गखोल्या , स्मार्त स्कूल अबिएल पुरस्कृत, शाळेच्या प्रत्येक  कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांचा सहभाग , डिजिटल वर्ग,विविध स्पर्धा व परीक्षा मध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना समानसंधी  आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ अशी या शाळेची वैशिष्टे आहेत असे पदवीधर शिक्षक कमलाकर बागवे यांनी सांगितले. तसेच कल्याणपासून काही अंतरावर असलेल्या बापसाई गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याची बैलगाडीतून गावात मिरवणूक काढण्यात आली. काही कुटुंबीयांनी या विद्यार्थ्यांना  ओवाळले.  

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email