मातृभाषेतून शिक्षण घ्या , गंधार कुलकर्णी करणार सायकलवरून भारतभ्रमंती
डोंबिवली दि.२५ – शाळेत शिकवतांना सध्याच्या शिक्षणात प्रयोगशीलतेचा अभाव आहे. या चाकोरीतून बाहेर पडण्यासाठी डोंबिवलीतील गंधार कुळकर्णी याने सव्वा वर्षाची सायकलवरून भारतभ्रमणाची मोहीम आखली आहे. मोहिम पूर्ण झाल्यावर भाषा अध्ययन आणि अध्यापनाचे सगळ्यांपेक्षा वेगळे, नाविन्य पूर्ण मॉड्युल तयार करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
रोज एका शाळेत दीड ते दोन तास जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी भाषेचे अध्ययन आणि अध्यापन या विषयावर संवाद साधायचा. मातृभाषेचा अभ्यास मुलांनी करावा यासाठी एका कृती सत्राच्या माध्यमातून मुलांना स्वतःच्या भाषेविषयी जाणीव करून द्यायची.
-स्थानिक बोलींची ओळख व्हावी म्हणून शब्दाची एक यादी त्या त्या बोलीत अनुवादित करुन घ्यायची.
-भाषा शिकताना आपण भाषेकडे साहित्या पलिकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टीने बघण्याची जाणीव निर्माण करायची.
या उद्दिष्टे घेऊन तो डोंबिवलीहून नागपूरला 12 जुलैपर्यंत पोहचणार आहे. त्याच्यापुढे 13 जुलै ला आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताच्या मार्गाने रामटेकहून निघून हिरद्वारला पोहचेल. त्याच्या पुढचा मार्ग विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना जोडणारा त्याने आखला आहे. जवळजवळ वीस हजार किलोमीटरचे सायकलिंग होईल असे त्याने सांगिले.
गंधारने पुणे विद्यापीठातून संस्कृतमध्ये एम्. ए. पूर्ण केले आहे.
कमीत कमी 200 शाळांना भेटी देण्याचा मानस आहे.