मातृत्व शिबिराचे उरण मध्ये आयोजन

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.०९ :- भारतातील टॉप मोस्ट पहिल्या तीन संस्थेपैकी एक संस्था असलेल्या BABY SURE FERTILITY CENTER या मातृत्व प्रदान करणाऱ्या संस्थेतर्फे शनिवार १४ डिसेंबर २०१९ व १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते सायं ४ या वेळेत उरण एज्युकेशन सोसायटी, पालक मैदान, उरण मोरा रोड येथे मोफत मातृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षे विविध प्रयत्न करून सुद्धा ज्या स्त्रियांना मूलबाळ होत नाही अश्या स्त्रियांसाठी या शिबिराचे आयोजन उरणमध्ये करण्यात आले आहे.

हेही वाचा :- बृहन्मुंबईसह विविध महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी 9 जानेवारीला मतदान

अनेकांना मातृत्व प्रदान केल्याबद्दल डॉ स्वाती डोंगरे यांना जागतिक पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.ते या शिबिरात सर्व स्त्रियांची पाहणी करणार आहेत. सदर शिबिरात स्त्रियांची विशेष रक्त तपासणी, सोनोग्राफी, सीमेन एनालिसिस हे महागडे टेस्ट शिबिरात मोफत करण्यात येणार आहे. स्त्रियांना मूलबाळ होण्यासाठी विशेष मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. १५ डिसेंबर पर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबिर सुरु असून जास्तीत जास्त नागरीकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ ओमकार माळी यांनी केले आहे.शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९३९३०५०५०५ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email