माणुसकीला काळीमा फसणारं कृत्य करणारे दोघे गाजाआड
भिवंडी:आपल्याच दोन अल्पवयीन पुताणींवर अत्याचार केल्या प्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांना अटक केली.भिवंडी तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फसणारा हा प्रकार घडला.नात्याने काका असलेल्या या दोघा सख्ख्या भावांनी आपल्याच दोन ६ वर्षीय पुताणींना खाऊचे आमिष दाखवून त्या दोघा सख्खा बहिणींवर अत्याचार केले.पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार शारीरिक वेदना वाढल्याने कुटुंबियांनी पिडितेकड़े विचारणा केली असता सदर प्रकार समोर आला व त्यांनी पोलिसात तक्रार दिली.मंगळवारी सायंकाळी एपीआय राजीव पाटील यांच्यासह सहायक पोलिस हवलदार भरत सिंह ,राजेश मुकादम ,राजेश पांडे, कैलाश वाढविन्दे यांनी सापळा रचून एका अन्य गवातुन या नाराधामांना अटक केली.त्यांना न्यायालयात हजर केले असता ठाणे जिल्हा न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.याप्रकरणी पुढील तपास एपीआय राजीव पाटील करत आहेत.