माझ्यातला कार्यकर्ता कधीही मरू देणार नाही ; एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिकांना वचन

ठाणे – कितीही मोठ्यापदी पोहोचलो तरी माझ्यातला कार्यकर्ता कधीही मरू देणार नाही. आज हा नेतेपदाचा जो सन्मान मिळाला आहे तो तुमच्या सर्वांचा आहेसुखदु:खात माझ्यासोबत असणाऱ्या शिवसैनिकांचा आणि ठाणेकरांचा आहेअसे कृतज्ञ उद्गार शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले. हा गौरव बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत असल्याचे ते म्हणाले.


शिवसेना नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हा शाखेने सोमवारी एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरी सत्कार शक्तीस्थळावर आयोजित केलात्याला उत्तर देताना शिंदे बोलत होते. घरच्या माणसांनी गुरुच्या साक्षीने त्याच्या शिष्याचा केलेला हा सत्कार आहेअसे ते म्हणाले. यावेळी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरेमाजी मुख्यमंत्री मनोहर जोशीअभिनेते सचिन पिळगांवकरखासदार राजन विचारेडॉ. श्रीकांत शिंदेआमदार प्रताप सरनाईकरवींद्र फाटकमहापौर मीनाक्षी शिंदेठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के उपस्थित होते.

आजदेखील मी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे १८ ते २० तास काम करत असतोमी मंत्री आहेनेता आहे असे जेव्हा माझ्या मनात येईलतेव्हा मी कार्यकर्त्यापासून लांब गेलो असेन आणि हे पातक या जन्मात तरी या एकनाथ शिंदेकडून होणे शक्य नाही. बाळासाहेबांच्या परीसस्पर्शाने सामान्य कार्यकर्त्याचा असामान्य कार्यकर्ता कधी होतो कळत नाही आणि याचा पुरावा म्हणजे हा एकनाथ शिंदे असल्याचे ते म्हणाले.

पैठणच्या एकनाथाचा रांजण भरल्याचे चित्र आज शक्तीस्थळावर दिसून येत आहेअसे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी  शिंदे यांच्या सत्कारप्रसंगी काढले. शिंदे यांच्या कार्याची उंची कोणत्याही फूटपट्टीने मोजता येणार नाहीती अंत:करणाने मोजावी लागेल, असे ते म्हणाले. शिंदेचे कार्य दैवी आहे त्यामुळे ते यशस्वी होणारच. नेतृत्वाने कार्यकर्त्यांची मने ओळखायची असतात आणि हे शिंदे यांना उत्तमप्रकारे साधले असल्याचे पुरंदरे म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेला पुढे नेणारे, यश मिळवून देणारे एकनाथ शिंदेंसारखे कार्यकर्ते आहेत हे शिवसेनेचे भाग्य असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी याप्रसंगी काढले. आपल्या मेहनतीने आपण या पदापर्यंत आलेला आहात. आत्मविश्वासाने पुढे जा यश निश्चितच तुमचे आहे, अशा शब्दात जोशी यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email