माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून बालंबाल बचावले
(म.विजय)
नगर दि.३० – माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या चारचाकी वाहनाला शुकवार दि.२९ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुणे नगर मार्गावर सरदवाडी जवळ अपघात झाला. या अपघातातून पाचपुते बालंबाल बचावले.
माजी मंत्री बबनराव पाचपुते हे शुक्रवारी रात्री नगरहून पुण्याकडे त्यांच्या फोर्ड इंडिव्हर या चारचाकी वाहनाने पुण्याला चालले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहायक योगेश भोसले चालक युवराज उबाळे हे होते.
रस्त्यात एका ट्रकचा बिघाड झाल्यामुळे ती ट्रक रस्त्यातच उभी होती. अंधारात रस्त्यात मध्येच ट्रक उभी असल्यामुळे व तिला कुठलीही पार्किंग लाईट किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काहीच नसल्यामुळे पाचपुते यांच्या चालकाला ट्रक उभी असल्याचे लक्षात न आल्यामुळे पाचपुते यांची गाडी ड्रायव्हर साईडने ट्रकच्या मागील बाजूस जाऊन आदळली.