माजी पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांना जिल्हा परिषदेच्या वतीने अभिवादन
( श्रीराम कंदु )
अधिकारी कर्मचारी वर्गाने घेतली ‘राष्ट्रीय एकात्मतेची शपथ’
ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने रविवार १९ नोव्हेंबर रोजी माजी पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला असून या निमित्ताने एकात्मता शपथ घेण्यात आली.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) चंद्रकांत पवार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनावणे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्वच्छता व पाणी पुरवढा ) मानसी बोरकर , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत कांबळे , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले , जिल्हा समाजकल्याण अधिकारी रविकिरण पाटील व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.