महेश पाटील यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार !!!!

श्री राम कांदु 

नवी मुंबई : महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन या पत्रकारांच्या संस्थेच्यावतीने दरवर्षी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात येणारा आदर्श नगरसेवक पुरस्कार डोंबिवलीचे लोकप्रिय नगरसेवक महेश पाटील यांना प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयेाजित “दि प्राईड ऑफ महाराष्ट्र” या १४व्या राज्यस्तरीय गौरव समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते नगरसेवक महेश पाटील यांच्यावतीने त्यांचे सहकारी सुजित नलावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन/ मोफत क्लासेस, महिलांसाठी व्यावसायिक  उपक्रम तसेच आदिवासी पाड्यातील अन्नदान, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे विविध उपक्रमात नगरसेवक महेश पाटील यांचा सहभाग  हे नेहमीच नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातात कार्यरत इतर मान्यवरांनासुध्दा त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email