महेश पाटील प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नागरिक वाढदिवस सोहळा संपन्न

डोंबिवली – महेश पाटील प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याच्या अखेरच्या शनिवारी त्या महिन्यात जन्मदिवस असणा-या ज्येष्ठ्य नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो.महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आज ३१ मार्च रोजी ज्येष्ठ नागरिक वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता.यात ८ ज्येष्ठ्य नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

महेश पाटील प्रतिष्ठान आणि वेलनेस फोरेव्हर केमिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यानिमित्त एका मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.या आरोग्य शिबिरात विविध आरोयाविषय चाचण्या ,तपासणी,विनामूल्य करण्यात आल्या.सदर कार्यक्रम शिवप्रतिमा सभागृह येथे संपन्न संपन्न झला.या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक तसेच मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात.ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलही आयोजित करण्यात येते.

स्थायी समिती सभापती राहुल दामले,भाजपा शहर अध्यश शशिकांत कांबळे,भाजपाचे शहर उपाध्यक्ष संजय विचारे,नगरसेविका सायली विचारे,नगरसेवक रमाकांत पाटील,नगरसेवक विनोद काळन यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ्य नागरिकांचे ,उपस्थित मान्यावारांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणा-या सर्व कार्यकर्त्यांचे नगरसेविका डॉ.सुनीता पाटील यांनी आभार मानले.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email