महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०९ – अनेक सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि दाखले वाटप करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी या प्रतिष्ठानचे कौतुक केले.

भाजप नगरसेवक महेश पाटील यांच्या महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने पूर्वेकडील स्वयंवर सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती वाढदिवस साजरा करण्यात आला. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा केला जातो. या प्रतिष्ठानच्यावतीने ६० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याचे यावेळी भाजप पदाधिकारी संजय विचारे यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री चव्हाण म्हणाले, एमआयडीसीच्या छोट्याश्या कट्ट्यावर हा उपक्रम सुरु झाला होता. गेली सातते आठ वर्षापासून हा उपक्रम सातत्याने सुरु आहे. सरपंच ते भाजप नेत्यापर्यतचा नगरसेवक प्रवास खूपच आणि लोकसेवेचे व्रत घेतलेले महेश पाटील यांच्या कामाचे कौतुक करावे लागेल. पाटील यांचा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात पुढे असतो. यावेळी महिला आघाडी अध्यक्षा दुसाने, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, कांताकाका, नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, सायली विचारे, पूनम पाटील, रसिका पाटील, महिला मोर्चा कल्याण जिल्हा सरचिटणीस अॅड. माधुरी जोशी, मनीषा राणे, सुरेखा पांडे यासंह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिला पदाधिकारी दमयंती भानुशाली, राधिका मोरे आणि भाजप डोंबिवली ग्रामीण झोपडपट्टी सेल संयोजक दत्ता वाठारे यांसह अनेकांनी अथक मेहनत घेतली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email