महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने रामनवमी निमित्त भंडा-याचे आयोजन

 

पूजासोहळयाचे व महाप्रसाद भंडा-याचे आयोजन

सालाबादाप्रमाणे याही वर्षी महेश पाटील प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या वतीने रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न होणार आहे.

डोंबिवली पूर्वेतील वॉर्ड क्रमांक – ८२ अयोध्या नगरी येथील भव्य राम मंदिर येथे पूजासोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सायंकाळी संपन्न होणा-या सदर पूजासोहळयादरम्यान येथील अग्रवाल हॉलमधे महाप्रसाद भंडा-याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळयाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून दर्शन,प्रसाद,तसेच महाप्रसाद भंडा-याचा लाभ घ्यावा असे आवाहन महेश पाटील प्रतिष्ठानचे सदस्य व कल्याण डोंबिवली मनपा परिवहन समिति सदस्य संजय राणे यांनी केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email