महिलेचे शोषण करणा-यांना नियतीनेच दिली शिक्षा
श्रीराम कांदु
गोरखपुर-उत्तर प्रदेश येथील गोरखपुर येथे नियतीनेच लाचखाऊ भ्रष्टाचा-यांना शिक्षा देल्याची घटना घडली आहे.विधवा महिलेला पेंशन मिळवुन देण्याच्या नावाखाली तिचे शारीरिक शोषण केल्याची घटना तेथे घडली.या महिलेला एड्स असल्याबद्दल मात्र ते अनभिज्ञ होते.
याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार गोरखपुर येथील एका गावी राहाणा-या या महिलेचे ६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते.तिचा पति मुंबईत काम करायचा .त्याला एड्स झाला होता व तीन वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले.पतीच्या सदर आजाराची लागण या महिलेलाही झाली.नंतर त्या महिलेची एका रोजगार सेवाकाशी ओळख झाली.त्याने तीला ग्रामप्रधान, ग्राम सेवक अशांना भेटावले.हे सर्व व इतर ९ जण यांनी महिलेला काम करुन देण्याच्या नावाखाली तिचे शारीरिक शोषण केले.हा प्रकार सुमारे ३ वर्ष चालूच होता.दरम्यान ही महिला आजारी पडल्याने तिचि रक्त तपासणी करण्यात आली तेव्हा तीला सदर आजार असल्याचे निष्पन्न झाले.सदर वृत्त समजताच त्या शोषण करणा-या १३ जणांनी रक्त तपासणी केली. त्यानाही सदर रोगाची लागण झाल्याचे यात स्पष्ट झाले.या प्रकारामुळे या तेराही जणांचे ढाबे दणाणले असून महिलेचे शोषण करणा-यांना नियतीनेच शिक्षा दिल्याची चर्चा होवू लागली आहे.