महिलेचे मंगळसूत्र लांबवले
कल्याण – डोंबिवली पश्चिमेकडील सुभाष रोड बंटी निवास येथे राहणारी महिला काल दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानाकाशेजारील स्काय वॉक उतरत असताना पाठीमागून येणाऱ्या अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून तेथून पळ काढला .या प्रकरणी सदर महिलेने डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: