महिला वेटर्सकडून वेश्याव्यवसाय करून घेतला   : ३ अटक ४ फरार

ठाणे – ठाण्यात घोडबंदर रोडवरील लॉजवर काही व्यक्तींनी आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत  दोन महिला वेटर्सकडून स्वतःच्या उपजीविकेसाठी वेश्याव्यवसाय करून घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ७ जणांविरूध्द कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यामध्ये आरोपी महेश रामधनी यादव, योगेश विश्वनाथ शेट्टी व युगेश्वरकुमार उर्फ सुनील वकील यादव सर्व राहणार ओवळा यांना अटक करण्यात आली आहे. बाकीचे ४ आरोपी अद्याप फरार आहेत.या सर्व आरोपिंनी संगनमत करून महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेतला. तसेच पैशाचे आमिश दाखवून त्यांना इतर ग्राहकांसोबत शरीरसंबध ठेवण्यास भाग पाडले. हे नराधम स्वत:च्या फायद्यासाठी इतरांडून पैसे घेवून त्यांच्यासोबत या महीलांना सबंध ठेवण्यास सांगत होते. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील या करीत आहेत.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email