महिला दिनी महिला मतदारांना ओळखपत्र वाटप कार्यक्रम
ठाणे – ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये 08 मार्च महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करून महिला मतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन उल्हासनगर येथील टाऊन हॉल येथे देखील करण्यात येणार आहे. भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी तसेच लोकशाही प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे महिला दिन कार्यक्रम साजरा करण्याचे निर्देश आहे. त्याअनुषंगाने तसेच सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हयातील महिला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्यक्ष महिला मतदारांची तफावत दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्हयातील सर्व महिला मतदारांनी व विशेषत: 18 ते 21 वयोगटातील तरूणींना नवविवाहित महिलांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करून जर मतदार यादीत नाव नसेल तर आपले नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यात यावी असे याद्वारे जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे जिल्हा यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.