महिलांच्या आरोग्य विषयक आव्हानांसंदर्भातल्या चर्चासत्राचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांच्या हस्ते

नवी दिल्ली, दि.२५ – महिला आरोग्यासंदर्भातल्या आव्हानांबाबत नवी दिल्लीत आयोजित केलेल्या चर्चासत्राचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज उद्‌घाटन केले.

महिला या चैतन्यशील समाजाचा बळकट स्तंभ असतात, महिला आणि बालकांची सर्वंकष काळजी घेतल्यानेच देशाचा शाश्वत विकास साधता येऊ शकतो असे त्या म्हणाल्या.

महिला आरोग्य क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. माता मृत्यू दराचे कमी झालेले प्रमाण हे या प्रगतीचे द्योतक आहे. गेल्या काही वर्षात भारतात माता मृत्यू दर कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय आरोग्य धोरणाअंतर्गत उचलण्यात आलेल्या पावलांमुळे संस्थागत प्रसूतीत 78.9 टक्के पर्यंत वाढ झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करतानाच दर्जेदार आरोग्‍य सेवा क्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.