महाशिवारात्रीचं पावन औचित्य साधुन मुंबई आस पास वेब पोर्टल तर्फे भव्य कवी संमेलन संपन्न

महाशिवारात्रीचं पावन औचित्य साधुन मुंबई आस पास वेब पोर्टल तर्फे भव्य कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं.डोंबिवली पूर्वेतील गोळवली येथील रीजेंसी मैदान येथे सदर महाशिवारात्रीच्या दिवशी कार्यक्रम संपन्न झाला यात ख्यातनाम कविंनी आपल्या कविता सादर केल्या असून प्रेक्षकांनी याचा रसिकतेने आस्वाद घेतला.त्याच प्रमाणे भाजपचे प्रदेश सचिव आमदार नरेन्द्र पवार,नगरसेवक रमाकांत पाटील,नगरसेवक जालिंदर पाटील,भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड,माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची या कार्यक्रमाला उपस्थिति होती.मुंबई आसपास वेब पोर्टलचे मुख्य संपादक राजेश सिन्हा हे या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक होते. मुंबई आसपास वेब पोर्टलचे अॅड.महेश शर्मा,करण हिन्दुस्तानी,स्वदेश मालवीय ,श्रीराम कांदु हे आयोजक होते.उपस्थित सर्व रसिकांचे मुंबई आस पास तर्फे मनपूर्वक आभार मानण्यात आले.या कवी संमेलनात वागीश  सारस्वत , सुरेश मिश्रा , सरवर भारती व योगेश मिश्रा यांनी आपल्या रचना सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करण हिन्दुस्तानी यांनी केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email