महाशिवारात्रीचं पावन औचित्य साधुन मुंबई आस पास वेब पोर्टल तर्फे भव्य कवी संमेलन
महाशिवारात्रीचं पावन औचित्य साधुन मुंबई आस पास वेब पोर्टल तर्फे भव्य कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.डोंबिवली पूर्वेतील गोळवाली येथील रीजेंसी मैदान येथे सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून महाशिवारात्रीच्या दिवशी म्हणजेच उद्या सायंकाळी ६ ते १० च्या दरम्यान हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.यात अनेक ख्यातनाम कवी आपल्या कविता सादर करणार असून नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा अशी आमची सर्वाना विनंती आहे.त्याच प्रमाणे भाजपचे प्रदेश सचिव आमदार नरेन्द्र पवार,नगरसेवक रमाकांत पाटील,नगरसेवक जालिंदर पाटील,भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड,माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिति असणार आहे.मुंबई आसपास वेब पोर्टलचे मुख्य संपादक राजेश सिन्हा हे या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक असून मुंबई आसपास वेब पोर्टलचे अॅड.महेश शर्मा,करण हिन्दुस्तानी,स्वदेश मालवीय ,श्रीराम कांदु हे आयोजक आहेत.दरम्यान सर्व वाचकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही आपणास मुंबई आसपास परिवाराच्या वतीने विनंती आहे.