महावितरण कंपनीच्या विविध सुधारणांमुळे पावसाळयात अखंडित वीज पुरवठा

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – महावितरण कंपनीने डोंबिवलीतील विज पुरवठा कायम अखंडित रहावा यासाठी सुमारे २४ कोटी रुपयांच्या खर्च करून विविध योजना हाती घेतल्या असून येत्या पावसाळयापूर्वी ही कामे पूर्ण होणार आहे.सध्या बाजी प्रभु चौकातील वीज पुरवठा नियंत्रित करणारे २५ ब्रेकर सुमारे ३० वर्षापूर्वीचे असून ते बदलण्याचे काम वीज पुरवठा खंडित न करता सुरु आहे.आतापर्यत ११ ब्रेकर बसवण्यात आले असून उरलेले काम येत्या आठवडयात पूर्ण होणार आहे.
या संदर्भात डोंबिवली महावितरण कपंनीचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड म्हणाले, महावितारणकच्या विज वाहिनी पश्चिम डोंबिवलीत सध्या खांबावरून असून पुढे त्या ५६ कि मी भूमिगत करण्यात येणार आहेत. तर अधिक क्षमतेची जनित्रे (ट्रान्सफार्मर )बसवण्यात येणार आहेत.तसेच पश्चिम डोंबिवलीत सध्या एकच वीज पुरवठा करणारे उपकेंद्र असून गणेश मंदिर येथे दुसरे उपकेंद्र तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे पश्चिमेतील वीज पुरवठयात लवकरच सुधारणा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डोंबिवलीत सुमारे १ लाख ८० हजार वीज ग्राहक आहेत. दरमहा सुमारे २२ कोटी बिले जमा होत असून केवळ एक टक्के वीज थकीत असल्याचे त्यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published.