महावितरणच्या मोबाईल अॅपच्या वापरामुळे जिल्हयात डोंबिवली प्रथम

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेत १ लाख ८० हजार विज ग्रहकांपैकी सुमारे १ लाख ६० हजार ग्राहक महावितरणच्या मोबाईल अॅपचा वापर करत असून याव्दारे ग्राहकांना मासिक बिल ,वीज पुरवठा खंडित होणार असेल तर पूर्व सूचना, मोबाईल मार्फत बिल जमा करण्याच्या सुविधा मेसेजद्वारे तत्काळ माहिती मिळते. त्यामुळे ठाणे जिल्हयात डोंबिवलीचा या बाबत प्रथम क्रमांक लागतो असे डोंबिवली महावितरण कपंनीचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड सांगीतले आहे.डोंबिवलीत सुमारे १ लाख ८० हजार वीज ग्राहक आहेत. दरमहा सुमारे २२ कोटीची बिले जमा होत असून केवळ एक टक्के वीज थकीत असल्याचे त्यांनी सांगीतले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email