महाराष्ट्र दिनी एस.टी. कडून शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान…!‍

एस.टी.मधून आजीवन मोफत प्रवासाची सवलत.

एका पाल्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एस.टी. महामंडळात नोकरी

मुंबई – राष्ट्राच्या संरक्षणासाठी धारातिर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या वीर पत्नींना एस.टी. महामंडळातर्फे “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान” योजने अंतर्गत एस.टी. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवासाची सवलत व त्यांच्या एका पाल्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एस.टी. महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. या योजनेचा शुभारंभ राज्यपाल  यांच्या हस्ते १ मे, २०१८ रोजी (महाराष्ट्र दिन) मोफत प्रवासाचे स्मार्ट कार्ड प्राथमिक स्वरुपात ५ वीर पत्नींना देऊन (शिवाजी पार्क, मुंबई) होणार आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी बोलताना, रावते म्हणाले की, देशासाठी प्राणाची अहुती दिलेल्या शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्याच्या हेतूने “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान” योजना कार्यान्वीत होत असून, या माध्यमातून शहीदांना श्रध्दांजली अर्पीत करण्याचे राष्ट्रीय कार्य एस.टी. महामंडळकडून होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमाबरोबरच सर्व जिल्हयात पालकमंत्री यांच्या हस्ते याच दिवशी त्या भागातील वीर पत्नींना या योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड प्रधान करण्यात येणार आहे.

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email