महामार्गावरील टेम्पो आणि कंटेनरच्या अपघातात दोन ठार
पालघर -मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर येथील चिंचपाडा येथे टेम्पो आणि कंटेनरचा अपघात झाला.यात दोनजण जागीच ठार झाले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचपाडा येथे सकाळी मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनरचालकाचं नियंत्रण सुटल्याने कंटेनर टेम्पोवर जाऊन धडकला. कंटेनरची जोराची धडक बसल्याने टेम्पोचा चक्काचूर झाला तर कंटेनरमधील सर्व सामान रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरले. या भयंकर अपघातात दोन जण जागीच ठार झाले.या अपघातामुळे या महामार्गावर वाहतुकीची प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती.रस्त्यावर वाहानांच्या लाबचंलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्यांची गैरसोय झाली.दरम्यान टेम्पो आणि कंटेनर बाजूला सरकविण्यात आला असून वाहतुक पूर्ववत झाली आहे.
Please follow and like us: