महानायक अमिताभ बच्चन यांना शिवसन्मान तर पत्रकार रफिक मुल्ला यांना गौरव पुरस्कार.. 

सातारा – हिंदवी स्वराज्याची राजधानी सातारा येथे पुन्हा छत्रपती शिवाजीराजे यांच्या शाही घराण्याच्या पुरस्काराची परंपरा सुरू झाली आहे, त्याप्रमाणे येथे राजधानी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदा महानायक अमिताभ बच्चन, यमुनाबाई वाईकर, रफिक मुल्ला, ललिता बाबर आणि अन्य मान्यवर विविध क्षेत्रात शाही पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

राजधानी महोत्सवात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. छत्रपती घराण्याचा मानाचा शिवसन्मान पुरस्कार बिग बी अमिताभ बच्चन यांना, तर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे जीवनगौरव पुरस्कार लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे धडाडीचे पत्रकार रफिक मुल्ला यांना साहित्य आणि पत्रकारिता विभागात गौरव पुरस्कार घोषित झाला आहे..

रयतेचे राजे शिवाजी महाराज यांनी आपल्या काळात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती, कलाकार शौर्य गाजवणारे शूर-वीर यांना विविध शाही पुरस्काराने सन्मानित केले, समाज आणि देशासाठी कार्य करणाऱ्यांची उचित दखल घेण्याचा त्यामागे हेतू होता, ही परंपरा महाराजांच्या पाश्चातही सुरू राहिली, महाराजांच्या 12 व्या वंशजापर्यंत ही सुरू असलेली परंपरा प्रतापसिंहराजे भोसले यांच्या कार्यकाळापर्यंत सुरू होती, ही परंपरा आता पुन्हा और झाली असून महाराजांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुन्हा त्याच तडफेने समाज धुरीणांची दखल घेतली आहे.

शाही पुरस्कार वितरण सोहळा दि. २७ रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शाहू स्टेडियममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत पंकज चव्हाण यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, गीतांजली कदम, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर आदी उपस्थित होते.

 

यावेळी जाहीर करण्यात आलेल्या सातारा गौरव पुरस्कार विजेत्यांची नावे अशी :

– शिवसन्मान पुरस्कार – अमिताभ बच्चन

– श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे जीवनगौरव पुरस्कार –  लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर

– साहित्यिक व पत्रकारिता – ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला,

– कला व सांस्कृतिक – श्वेता शिंदे,

– क्रीडा (विभागून) – धावपटू ललिता बाबर, पैलवान नंदकुमार विभुते,

– शिक्षण – पुरूषोत्तम शेठ,

-उद्योजकता – अजित मुथा,

-आदर्श सेवा – बबनराव उथळे,

-छोटे उद्योजकता – राजेंद्र घुले,

– सामाजिक कार्य – माहेश्वरी ट्रस्ट,

-विशेष कर्तृत्व – मेजर गौरव जाधव,

-कृषी – संतोष सूर्यवंशी,

-आदर्श ग्राम – हिवरे (ता. कोरेगाव),

-पर्यावरण मित्र – विजय निंबाळकर.

Hits: 16

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email