महसूलमंत्री चंद्रकात पाटील शनिवारी डोंबिवलीत
डोंबिवली –डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अनुदान वितरण व पुरस्कार प्रदान सोहळ्यानिमित्त महसूल,सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील उद्या शनिवार १७ रोजी डोंबिवलीत येत आहेत .
पेंढारकर महाविद्यालयाजवळ असलेल्या माऊली सभागृहात सायंकाळी ६ वाजता समारंभ असून या साठी ते डोंबिवलीत येत आहेत महसूल मंत्री झाल्यानंतर ते प्रथमच डोंबिवलीत येत आहेत सामाजिक,सांस्कृतिक ,वैद्यकीय ,शैक्षणींक, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील ११७ संस्थाना उत्तम कामगिरीबद्दल धर्मदाय निधी वितरण समारंभ आहे त्याच प्रमाणे सहकार मित्र पुरस्कार अरविद खळदकर यांना तर समाज मित्र पुरस्कार वयं संस्था ,जव्हार यांना प्रदान करण्यात येणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन अध्यक्ष उदय कर्वे यांनी केले आहे
Please follow and like us: