महसुल अधिकारी परिषदेच्या धर्तीवर महापालिका अधिका-यांच्या परिषदेचं आयोजन

महसुल अधिकारी परिषदेच्या धर्तीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिका अधिका-यांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे. ७ आणि ८ डिसेंबरला ही अधिका-यांची पहिली परिषद होणार आहे. नागरी संशोधन केंद्रात २ दिवस आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेमध्ये सर्व अधिका-यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेणार असल्याचं पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. परिषदेच्या पहिल्या दिवशी सर्व वरिष्ठ अधिका-यांचा समावेश असून यामध्ये त्यांच्याकडे असलेल्या विभागांचा आढावा घेण्यात येणार आहे. प्रलंबित प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रकल्प प्रलंबित असल्याची कारणमिमांसा आणि उपाययोजना यावर चर्चा होणार आहे तर परिषदेच्या दुस-या दिवशी सर्व विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, स्वच्छता निरिक्षक यांचा तपशीलवार आढावा घेण्यात येणार आहे. महापालिका स्तरावर अशा पध्दतीची परिषद पहिल्यांदाच होत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email