मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो – राज ठाकरे
प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना का आडकाठी केली जाते, असा सवाल विचारत गणेश मंडळांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करावा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.मुंबई महापालिकेने हायकोर्टाच्या आदेशानंतर गणेश मंडळांना मंडपासाठी अटी टाकल्या आहेत. दक्षिण मुंबई, गिरगाव या भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जात नसल्याची तक्रार आहे.
हेही वाचा :- लोकल ट्रेन मध्ये साप
गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणेच उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. गेली ६० ते ७० वर्षे गिरगावात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र आत्ताच याबाबत तक्रार आली, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गणेशोत्सव वर्षातून एकदा दहा दिवस असतो. त्यासाठी का आडकाठी केली जाते असा प्रश्न विचारत राज ठाकरे पुढे म्हणाले, मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करा असं आवाहन राज यांनी गणेशोत्सव मंडळांना केले.
मंडपांसाठी मुंबई मनपा परवानगी देत नसल्याची तक्रार देत गणेश मंडळं राज ठाकरे यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले होते. त्यावर राज ठाकरे यांनी दणक्यात गणेशोत्सव साजरा करा असा आदेश दिला आहे.