‘ मर्चंट नेव्ही – एक करिअर ‘ या विषयावर कॅप्टन प्रकाश भालचंद्र जोग यांचे व्याख्यान

विषय-वेधचे सातवे पुष्प

डोंबिवली – ‘ विषयवेध ‘ ही व्याख्यानमाले अंतर्गत शनिवारी,७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ या दरम्यान ‘ मर्चंट नेव्ही – एक करिअर ‘ या विषयावर कॅप्टन प्रकाश भालचंद्र जोग या जलवाहतूक सल्लागाराचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.रोटरी क्लब ऑफ़ डोंबिवली वेस्ट , रोटरॅक्ट क्लब ऑफ के व्हि पेंढारकर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तरुण आणि होतकरू युवापिढीला सागरभ्रमंतीतील आव्हान,धाडस,थरार,जीवनसाफल्य या अनेक पैलूंची ओळख यातून होणार आहे.त्यामुळे आबालवृद्ध अशा सर्व वयोगटातल्या श्रोत्यांना या व्याख्यानाचा लाभ आणि आस्वाद घेता येईल.तरी तरुण,विद्यार्थी,आईबाबा,आजीआजोबा,पालक,शिक्षक अशा सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.सर्व सदस्य आणि कुटुंबीयांनी आपापल्या परिचयातील युवापिढीला श्रोते म्हणून येण्यासाठी प्रोत्साहित करावे असेही आवाहन प्रकल्प प्रमुख रो.विनोद देशपांडे यांनी केले आहे.सदर कार्यक्रम शुभमंगल हॉल, भाजी मार्केट,डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email