‘मरीन ड्राइव्ह’वरून ५ अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी बेपत्ता
मुंबई दि.०२ – मरीन ड्राइव्ह वरून ५ अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी बेपत्ता झाल्या आहेत. कुलाब्यातील ‘फोर्ट कॉन्व्हेंट स्कुल’मध्ये आठवीत शिकणाऱ्या या विद्यार्थीनी आहेत. निकालात गुण कमी मिळाल्याने त्या नाराज होत्या. मुलींच्या कुटुंबियांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस या पाचही मुलींचा शोध घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
हेही वाचा :- डोंबिवलीत घरफोडी ७८ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास
या पाचही विद्यार्थिनींच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी शोधकार्य सुरू केलंय. या प्रकरणात इतर शंकांनाही वाव असल्यामुळे त्या दृष्टीकोनातुनही पोलीस तपास करीत आहेत. कुलाब्यातील ‘फोर्ट कॉन्व्हेंट स्कुल’च्या या विद्यार्थिनी इयत्ता आठवीमध्ये शिकत आहेत. नुकत्याच लागलेल्या शाळेच्या निकालात कमी गुण मिळाल्याने त्या नाराज होत्या आणि त्यामुळेच त्या बेपत्ता असल्याची शंका प्राथमिक स्तरावर व्यक्त केली जातेय.