मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ;मराठी भाषा जतन संवर्धन विकास मंडळातर्फे स्मरणपत्र
डोंबिवली- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी सातत्याने पाठपुरवा सुरू असला तरी अद्याप ही मागणी प्रलंबित आहे .या मागणीचे पुन्हा एकदा स्मरण करून देण्यासाठी डोंबिवली येथील मराठी भाषा जतन संवर्धन विकास मंडळाने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे .
डोंबिवली येथील मराठी भाषा जतन संवर्धन विकास मंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला .मात्र आद्यप हा विषय प्रलंबित राहिल्याने अखेर मराठी भाषा जतन संवर्धन विकास मंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यां ना निवेदन सादर केले असून या निवेदनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ,महाराष्ट्र साहित्य परिषद व प्रातिनिधिक संस्थांनी पत्राद्वारे निवेदनाद्वारे तसेच स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करून याशिवाय ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ठराव पारित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावाया मागाणी कडे लक्ष वेधले होते .अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील अटी आणि कसोट्यावर संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रा रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीचे गठन करण्यात आले होते . या समितीने अनेक पुराव्यानिशी सिद्ध केलेल्या निष्कर्षानुसार मराठी भाषेला निर्विवादपणे अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा आशा प्रकारचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारने सादर करुन बराच कालावधी लोटला आहे .त्यामुळे मराठी भाषा जतन संवर्धन विकास मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीनि व्यक्तीशः पंतप्रधानांकडे या प्रलंबित मागणी बाबत पाठपुरावा करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत प्रयत्न करावेत .आपल्या महाराष्ट्राच्याया अस्मितेच्या ,संस्कृतीच्या ,भाषेच्या ,साहित्याचा ,आणि समस्त मराठी भाषकांच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असलेल्या या मागणीला बळ द्यावे अशी मागणी केली आहे तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्ष श्रीपाद जोशी ,९१ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ,९० व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे,८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद सबनीस,मराठी साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे ,कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे ,९० व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे आदीनी निवेदन मुख्यमंत्र्याना धाडले आहे .