‘मराठी भाषा गौरव दिन विशेष’ “जय महाराष्ट्र” मध्ये मराठी भाषा मंत्री विनोद तावडे

मुंबई – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात “मराठी भाषा गौरव दिनानिमित्त” मराठी भाषा मंत्री विनोद तावडे आणि मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी रोजी दूरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवरून सायं. ७.३० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका धनश्री लेले यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत अधिकाधिक लोकांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे आवाहन, संगणकावर मराठीचा वापर वाढावा यासाठीचे प्रयत्न, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा तसेच मराठी भाषा ग्लोबल होण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, मराठी भाषा संवर्धनामध्ये बिगर शासकीय संस्थांचा सहभाग, विश्वकोशाचे अद्यावतीकरण, ‘भिलार पुस्तकांचं गावं’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती तावडे आणि गगराणी यांनी “जय महाराष्ट्र” कार्यक्रमातून दिली आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email