मराठी पाटय़ांच्या मुद्दावर मनसेचा सहाय्यक कामगार आयुक्तांना घेराव

(श्रीराम कांदु )

कल्याण   : विक्रोळीला दुकानांवर मराठी पाट्या लावण्या संदर्भात पत्रक देताना मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच मराठी पाटय़ाच्या मुद्यावर मनसे आक्रमक झाली असून कल्याण मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कल्याण कामगार आयुक्त कार्यालयात जाऊन सहाय्यक कामगार आयुक्तांना घेराव घातला.

पाच महिन्यापूर्वी मनसे तर्फे निवेदन देण्यात आले होते. अद्याप त्यावर काही कार्यवाही न झाल्याने आज पुन्हा धडक दिली. सहाय्यक आयुक्त संतोष भोसले यांना जाब विचारला. दहा दिवसात पूर्तता करु असे आश्वासन मनसेला आयुक्तांच्या मार्फत देण्यात आले आहे.

१ मे महाराष्ट्र दिनी मनसेच्या वतीने कल्याण मधील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. यांनतर १५ दिवसांचा कालावधी दुकानदारांना देत १६ मे रोजी  मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना मनसेने काळे देखील फासले होते.  या आंदोलनानंतर दहा दिवसांनी मनसेच्या वतीने या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्तांना निवदेन देत मराठी पाट्या न लावण्याऱ्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी कारण्यात आली होती. मात्र याला ५ महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने सोमवारी मनसेने पुन्हा सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट घेत घेराव घातला. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email