मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात जन सुनावणी,१८५० व्यक्तिगत, ६३ संस्थांची निवेदने प्राप्त

ठाणे – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासंदर्भात ठाणे जिल्ह्यातून विविध  संस्था आणि संघटना यांची ६३ त्याचप्रमाणे व्यक्तिगत स्वरुपाची १८५०  निवेदने ठाणे येथे  झालेल्या जनसुनावणी दरम्यान  राज्य मागासवर्ग आयोगाला प्राप्त झाली अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयोगातर्फे दिवसभर ही जाहीर सुनावणी नियोजन भवनाच्या सभागृहात सुरु होती. यावेळी सुधीर ठाकरे, दत्तात्रय बाळसराफ,डॉ सुवर्णा रावळ, डॉ कर्डिले, सदस्य सचिव डी डी देशमुख उपस्थित होते. प्रारंभी शासकीय विश्रामगृह येथे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, सहायक आयुक्त समाजकल्याण उज्वला सपकाळे यांनी आयोगाच्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   

अध्यक्ष गायकवाड पत्रक परिषदेत म्हणाले कि, राज्यभर अशा जन सुनावण्या घेण्यात येत असून यानंतर प्रत्येक तालुक्यातील ५ गावे निवडून नमुना सर्वेक्षण केले जाईल. त्याचबरोबर ऐतिहासिक पुराव्यांची योग्य तपासणी करून मग राज्य शासनाला आयोग अहवाल सादर करेल. लातूर, अमरावती, नगर, सोलापूर येथे सुनावण्या झाल्या असल्याचे ते म्हणाले.

ठाणे जिल्ह्यातील मराठा समाज हा प्रामुख्याने स्थलांतरित असून उदरनिर्वाहासाठी मोल मजुरीवर अवलंबून आहे. बहुतेक जणांचा मूळ व्यवसाय शेती असला तरी जमीन धारणा कमी झाल्याने उत्पन्न पुरेसे नाही परिणामत: मजुरीवर अवलंबून राहावे लागते अशा स्वरुपाची माहिती निवेदनात देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. अनेकांनी दारिद्र्यरेषेखाली असल्याचे पुरावे पण दिले आहेत असे ते म्हणाले. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email