मराठा आरक्षणाच्या बाबतीत ८ मे रोजी ठाण्यात तर १६ मे रोजी कोकण भवन येथे जनसुनावणी

ठाणे दि ३०: महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ८ मे रोजी ठाणे येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जनसुनावणी घेणार आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा व नवी मुंबई पालिका क्षेत्रासाठी कोकण भवन येथे १६ मे रोजी जाहीर जन सुनावणी घेण्यात येणार आहे.

आयोगाचे अध्यक्ष एम.जी.गायकवाड, सदस्य सुवर्णा रावळ, सुधीर ठाकरे व इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत ८ मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे होणाऱ्या जन सुनावणीत ठाणे व पालघर जिल्ह्यातील व्यक्ती, संस्था यांनी मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक  मागासलेपण याविषयी आपले काही म्हणणे किंवा सुचना मांडावयाच्या असल्यास दुपारी ११ ते 3 या वेळेत ऐतिहासिक दस्तावेज, पुरावे यासह उपस्थित राहावे असे सहायक आयुक्त समाजकल्याण उज्वला सकपाळे कळवितात.कोकण भवन येथे देखील सर्व संबंधितानी १६ मे रोजी ११ ते 3 या वेळेत समक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे आयोगासमोर मांडावे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email