ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे न्यायलयच्या आदेश
(पुजा उगले )
ठाणे न्यायालयाने ड्रग्ज तस्करीतील फरार आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णी व कुख्यात ड्रग तस्कर विक्की गोस्वामी यांची मालमत्ता जप्त
ठाणे न्यायालयाने ड्रग्ज तस्करीतील फरार आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णी व कुख्यात ड्रग तस्कर विक्की गोस्वामी यांची मालमत्ता जप्त
करण्याचा आदेश दिला आहे .गेल्या वर्षी (२०१६) मधे २२०० कोटी रुपयांच्या इफेड्रीन ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड ठाणे गुन्हे शाखेने केला होता,आणि इफेड्रीन ड्रग्जचा साठा ठाणे पोलिसांनी सोलापूरच्या एव्हॅान लाइफ सायन्सेस कंपनीतून जप्त केला होता.न्यायालाच्या आदेशाने ममता कुलकर्णी च्या अडचणीत वाढ होन्याची पूर्ण शक्यता आहे.
सोलापुरच्या एव्हॅान लाइफ सायन्सेस कंपनीतून इफेड्रीनपासून मेथ एम्फटामाइन ड्रग्ज तयार करण्यात येत होते.या आरोपाखाली ठाणे पोलिसानी गेल्या वर्षी अनेक आरोपींना जेरबंद केले होते. या प्रकरणात विक्की गोसवामी आणि त्याची पत्नी ममता कुलकर्णी प्रमुख आरोपी असून दोघेही फ़रार आहेत.मात्र फरार असलेल्या ममता आणि विकी यांच्याविरोधात ठाणे न्यायलयनी अजामीनपात्र वारंट काढले होते. न्यायालयात उपस्थित राहण्याची मुदत देऊनही दोघेही हजर झाले नाहीत. त्यामुळे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी ममताची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली होती. याबाबत शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने तिची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुढची कारवाई होणार आहे. ममता हिचे मुंबईतील अंधेरी भागात तीन फ्लॅटअसून त्यावर जप्ती येणार आहे.