* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच लेखकाच्या भूमिकेत ; लता मंगेशकरांवर लिहिणार पुस्तक – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच लेखकाच्या भूमिकेत ; लता मंगेशकरांवर लिहिणार पुस्तक

(म.विजय)

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जरी एक आक्रमक आणि अभ्यासू नैतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित असले तरी त्यांच्या मध्ये एक उत्तम कलाकार सुद्धा दडलेला आहे हे सर्वश्रुत आहे. त्यांना कला, साहित्य आणि संस्कृती या विषयाची उत्तम जाण असल्याचे त्यांच्या विचारात जाणवते. त्याच आक्रमक राजकारण्यामागील दडलेला लेखक लवकरच सर्वांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणार असून त्या माध्यमातून ते लता दीदींचा जीवनपट उलगडणार आहेत. राज ठाकरे लवकरच पुस्तक लिहिणार असून त्यांनी त्याची तयारी सध्या सुरू केली आहे असे समजते. लतादीदींच्या दुर्मिळ छायाचित्रांसाठी त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे एनएफएआय आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला सदिच्छा भेट दिली असता, त्यांना तिथे लता दीदींची अनेक दुर्मिळ छायाचित्र पाहायला मिळाली.

त्यांनी जेव्हा लता दीदी यांचे ते दुर्मिळ फोटो बघितले तेव्हाच हे फोटो आपल्याला पाठवण्याची सबंधित संस्थेला विंनती केली तेव्हा या विषयाचा उलगडा झाला. यापूर्वी राज ठाकरे यांनी स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांचे चरित्र फोटोबायोग्राफीतून मांडले आहे. आता लता मंगेशकर यांच्या पुस्तकासाठी ते कोणता फाॅर्म वापरणार, हे पाहणे औत्सुक्ताचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *