मनसेवाले भेकड, नपुंसक, नेभळट: निरुपम
मनसेवाले भेकड, नपुंसक, नेभळट: निरुपम
श्रीराम कांदू
मनसेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्यामुळं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम खवळले आहेत. निरुपम यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची भेकड, षंढ आणि नेभळट अशा शब्दांत संभावना केली आहे. सरकारनं या हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यास सडेतोड काँग्रेसकडून सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावरील हल्ल्यानंतर निरुपम यांनी ट्विटरवरून संतप्त भावना मांडल्या आहेत. ‘पक्षाच्या कार्यालयात कुणीही नसताना मनसेच्या भ्याड लोकांनी हल्ला केला. आमच्या कार्यालयापासून पोलीस ठाणं अवघ्या २४ मीटरवर असताना हा हल्ला झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन तातडीनं कारवाई करायला हवी. तसं न झाल्यास आमच्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.