मनसेने केलेल्या कामाची जाहिरातबाजी हे सरकार करतंय – राज ठाकरे
धुळे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे धुळ्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांचे शाहू नाट्य मंदिरात भाषण सुरू आहे.
भाषणातील मुद्दे :
नाशिक, पुणे, धुळे व अमरावती या शहरांशी माझ जुनं नातं आहे. कॉलेजमध्ये असताना 1986 साली पहिल्यांदा धुळ्यात आलो होतो. हे छान शहर होतं, इतक्यावर्षांनी आलो पण काहीच सुधारणा नाही.
पूर्वीपेक्षा आता धुळे शहर जास्त बिघडलंय मी येथे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेलो नाही, ज्यांना या शहराबद्दल आस्था वाटते त्यांच्यासाठी मी आलो आहे. शहरासाठी काहीतरी करायचंय त्यासाठी आलोय. निवडणुकी आल्या की जाहिराती निघतात, झेंडे फडकतात. वर्षानुवर्षे देशांत दुसरा धंदा काय आहे.
आज मी जे काही बोललो ते 10 टक्के लोकांना जरी समजलं तरी सार्थकी लागलं असं समजेन. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्याचं कारणच नाही. 1984 साली राजीव गांधींना बहुमत मिळालं होतं, 30 वर्षांनतर मोदींना बहुमत मिळालं. ज्यांनी सत्तेवर बसवलं त्या व्यापाऱ्यांची वाट लावली, राज ठाकरेंचा आरोप