मनसेच्या आंदोलनाचा ठरला फुसका बार : फेरीवाले पुन्हा रस्त्यावर

( श्रीराम कांदु )

मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात धडक दिली. फेरीवाल्यांच्या सामानाची नासुधुस करत त्यांना पिटाळून लावले होते. मात्र या आंदोलनानंतर काही तासातच फेरीवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान मांडल्याने मनसेचे आंदोलन म्हणजे फुसका बार ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईच्या एल्फिस्टन रेल्वे स्थानाकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 20 हुन अधिक प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक प्वित्राघेत संताप मोर्चा काढत फेरीवाल्यांना पुढच्या 15 दिवसांत हटवा, अन्यथा मनसे स्टाईलने फेरीवाले हटवू, असा इशारा रेल्वेसह पालिका प्रशासनांना दिला होता. राज ठाकरेंनी दिलेली 15 दिवसांची मुदत शनिवारी संपताच मनसेने मुंबई, ठाणे पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. शनिवारी सकाळी मनसैनिकांनी कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात धाव घेत फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस करत त्यांना पिटाळून लावले. मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे तेथून काढता पाय घेतलेल्या फेरीवाल्यांनी काही तासातच पुन्हा आपले बस्तान स्टेशन परिसरात मांडल्याचे दिसून आले. त्यामुळे मनसेचे हे आंदोलन मात्र फुसका बार ठरल्याचे दिसून आले.

कल्याण-डोंबिवलीत मनसैनिकांना ठरविले दंगेखोर :

दोन्ही शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 25 ते 30 जणांवर दंगलीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्याचा स्टंट करून सामानाची मोडतोड व मारहाण केल्याप्रकरणी कल्याणाच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यासह जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह 25 ते 30 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह गट नेते प्रकाश भोईर, परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, प्रकाश माने, सागर जेधे, रविंद्र गरूड, सिद्धार्थ मातोंडकर, अशा 8 ते 10 मनसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सोमवार सकाळी साडेनऊ वाजता रामनगर पोलिस ठाण्यात आम्ही स्वतःहून हजर होणार असल्याचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी कळविले आहे. दरम्यान अवैध फेरीवाल्यांना हटविण्याचे कार्य प्रशासनाऐवजी आम्ही केले आहे. मात्र शासनाने आम्हाला दंगेखोर ठरविले आहे. हे निषेधार्ह असल्याचे मत शहराध्यक्ष घरत यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email