मतिमंद मुलीवर अत्याचार : आरोपीला अटक

कल्याण – माणुसकीला काळीमा फासणारी अमानुष अशी एक घटना नुकतीच कल्याण शहरात घडली आहे.कल्याण येथील एक २० वर्षीय मतिमंद मुलगी घरात एकटीच असताना शेजारी राहणार्या एका ३५ वर्षीय इसमाने तिला आपल्या घरी बोलावले आणि तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला.याप्रकरणी कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.सायंकाळी घरची लोक घरी आल्यावर त्यांना या प्रकाराबद्दल समजले.याप्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारी नुसार सदर प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी गणेश गोसावी याला अटक केली.त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० जानेवारी पर्यंत पोलिस कोठडित ठेवन्याचे आदेश दिलेत.कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.राजपूत याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email