मतमोजणीसाठी कै. सुरेंद्र वाजपेई बंदिस्त सभागृह सज्ज

(श्रीराम कांदु)

[ मध्यरात्री निकाल जाहीर होणार ]

डोंबिवली दि.२१ – कल्याण लोकसभा 2019 निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील कै. सुरेंद्र वाजपेई बंदिस्त सभागृह मत मोजणीसाठी सज्ज झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादंबने स्वतः जातीने लक्ष देत असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी एकूण 31 फेऱ्या होणार असल्याने निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होण्यास मध्यरात्र होईल असे त्यांनी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथमध्ये 44 टक्के, उल्हासनगरमध्ये 42.5, कल्याण पूर्व 41 टक्के, डोंबिवलीत 43.2 कल्याण ग्रामिण 46.5 तर मुंब्रा-कळवा 39 असे एकूण सरासरी 45.28 टक्के  मतदान झाले होते. कल्याण लोकसभा मतदार संघात 19 लाख 65  हजार 637 मतदार असून त्यापैकी अंदाजे 8 लाख 42 हजाराच्या आसपास मतदारांनी आपला हक्क बजावला. ही मतमोजणी गुरुवारी 23 मे रोजी क्रीडासंकुलातील कै. सुरेंद्र वाजपेई बंदिस्त सभागृहात होणार आहे. सकाळी वाजता निवडणूक यंत्रणा सभागृहाचा ताबा घेणार आहे. त्याची जय्यत तयारी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली.

या ठिकाणी 88 टेबल तैनात करण्यात आले आहेत. यातील चार टेबल पोस्टल मतमोजणीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक तबलावर चार कर्मचारी काम पाहणार आहेत. एकूण 100 अधिकारी आणि 400 कर्मचाऱ्यांचा ताफा मतमोजणी व इतर कामासाठी तयार आहे. मतपेट्या सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या तळघरातील स्ट्रॉंगरूममध्ये असून तेथे पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. या मतपेट्या मतमोजणीच्या दिवशी सकाळी कै. सुरेंद्र वाजपेई बंदिस्त सभागृहात पोलीस बंदोबस्तामध्ये हलविण्यात येणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी 300 तर परिसरात 300 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. मतमोजणीच्या जास्तीत जास्त 31 व कमीत कमी 20 फेऱ्या होणार आहेत. एका फेरीसाठी किमान 30 ते कमल 40 मिनिटे लागणार आहे. पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी सुरवातीस घेण्यात येणार आहे. लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यातील प्रत्येक 5 व्हीव्हीपॅड आणि ईव्हीएम मशीनमधील मतांची तपासणी सर्वात शेवटी होणार आहे. मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी कल्याण रस्ता बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. निकाल पाहण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्ते व नागरीकांना उन्हाचा त्रास होवू नये म्हणून रस्त्यावर मंडपशेड उभारण्यात आली आहे. याव्यतिरीक्त बंदिस्त क्रीडा संकुलाबाहेर चार मंडप, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, ध्वनीक्षेपक आणि एलईडीस्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email