मतदार पडताळणीसाठी 20 जूनपर्यंत निवडणूक अधिकारी घरोघरी भेट देणार   

ठाणे – ठाणे जिल्हयात 15 मेपासून मतदार याद्यांचे पुनर्रक्षण केले जात आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देवून मतदारांची पडताळणी करण्याचे काम करीत आहेत. या सर्व केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत घरोघरी भेटी देवून मतदारांची पडताळणी करण्यात येत आहे. याकामी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी  आणी मतदारांची पडताळणी करण्याचे काम 20 जून पर्यंत सदर अधिकारी गृहभेटी देऊन करणार आहेत.

13000 नविन पात्र मतदारांची नोंदणी

        आज अखेरपर्यंत 2 लाख 85 हजार 233 घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये 13000 नविन पात्र मतदारांची नोंदणी करण्यात आली असून त्यांच्याकडून फॉर्म नं.6 भरुन घेण्यात आला आहे. तसेच 20000 मतदारांची दुबार नोंदणी तर 7500 मयत मतदार आढळून आले आहेत. 34 हजार मतदारांचे कायमस्वरुपी स्थलांतर झाल्याचे आढळून आले आहे.

केंद्रस्तरीय अधिकारी ज्या पात्र मतदारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांची नावे नोंदणी करणे, 1 जानेवारी 2019 रोजी पात्र ठरणा-या भावी मतदारांची नांवे गोळा करणे. दुबार,मयत व कायमस्वरुपी  स्थलांतरीत मतदारांची माहिती गोळा करणे तसेच मतदार यादीतील नोंदणींची दुरुस्ती करणे आदींबाबत मार्गदर्शन करुन नोंदणीबाबत माहिती देणार आहेत.

मतदार केंद्रस्तरीय अधिकारी संबंधीतांकडून फॉर्म भरुन घेतील. ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही. तसेच कृष्णधवल छायाचित्र आहे. त्यांचे नजीकचे रंगित छायाचित्र फॉर्म नं.8 भरुन मतदान केंद्रस्तरीय  अधिका-यांकडे जमा करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email