मतदार नोंदणीसाठी कॉलेज एम्बेसेडर्सच्या परिषदेस तरुणांचा उत्साहाने प्रतिसाद
(श्रीराम कांदु)
ठाणे दि.०५ – मतदार नोंदणीसाठी उत्साहाने काम करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता कॉलेज एम्बेसेडर्सची परिषद जिल्हा नियोजन कार्यालय ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेकरिता ठाणे जिल्हयातील ठाणे,मिरारोड,उल्हासनगर,मुरबाड,नेरूळ,वाशी,कल्याण आशा एकूण ३२ महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी उपस्थीत होते.
जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी ब्लॉक लेव्हल अधिकारी हे चार प्रकारे काम करत आहेत ते सांगितले. म्हणजेच फोटो जमा करणे, ई आरडी डाटा जमा करणे,मयत,दुबार,स्थलांतर झालेल्या,अशा सर्व परीने लोकांपर्यंत पोहचत आहेत.मतदान केले पाहिजे.येणाऱ्या काही दिवसात विद्यार्यांचा व्हॉटसएप ग्रुप तयार करून त्यांच्याशी कायम संपर्कात रहावे असेही त्यांनी आवाहन केले. २५ जानेवारी रोजी मतदार दिनानिमित्ताने मतदान नोंदणीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात येईलअसे ते म्हणाले.
प्रारंभी उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी विद्यार्थ्याना मतदार नोंदणीविषयक माहिती दिली. मतदान नोंदणीत विद्यार्थ्याना सोशल साईट चा वापर जास्त आवडतो त्याचा वापर ते किती चांगल्या प्रकारे करु शकतात याबाबत मार्गदर्शन केले.
अशी करावी नोंदणी
www.ceo.maharashtra.gov.in व www.thaneeletion.com या वेबसाईटवरुन सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करुन घेऊन आपल्या भागात मतदानाबाबत जनजागृती करून रहिवाशांना पूर्ण माहिती द्यावी व त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांची उकल करुन दयावी. तसेच एख्याद्या व्यक्तीच्या नावात बदल असल्यास त्याला फॉर्म क्र ८ व स्थलांतरानंतर पत्यात बदल झाला असल्यास, ८(अ) हा फॉर्म भरावा. तसेच NRI व्यक्ती साठी फॉर्म क्र ६(अ),व स्वतः चे नाव रद्द करणे किंवा अपक्ष व्यक्तीचे नावे रद्द करण्यासाठी फॉर्म क्र ७ चा भरावा अशी माहिती देण्यात आली. महाविद्यालय प्रवेश प्रक्रीयेच्या वेळी फॉर्म क्र ६ सुद्धा भरून घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. जर विद्यार्थ्याकडे पेन कार्ड,आधार कार्ड,बिल पावती,भाडे पावती,किंवा खोली भाड्याचा कराराची प्रत, रहिवासाचा दाखला म्हणून महाविद्याया ने देलेले पत्र. या वरही पहिल्यांदा मतदान करण्यासाठी विद्यार्थी फॉर्म भरू शकतो अशी माहिती दिली.
१-१-२०१८ ला १८ वर्ष वय पूर्ण केलेल्या तरूण वर्गानी फॉर्म क्र ६ भरून आपले नावं मतदार यादीत नोदणी करून घ्यावे.जिल्ह्यातील ५९ हजार मतदारानी नावनोंदणी केली असून ९ लाख मतदारांचे रंगीत फोटो जमा करण्याचे काम सुरु आहे.
फुटपाथवर वर राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मतदार कार्ड
मतदार नांव नोंदणीमध्ये महिलांची संख्या कुठे तरी कमी आहे हे दिसून आले आहे त्याकरिता ग्रामीण भाग,मोल मजुरी,शेत मजुरी करणाऱ्या महिलांमध्ये जागृती निर्माण करवी असे आवाहन करण्यात आले व फुटपाथवर वर राहणाऱ्या व्यक्तींकडे सुद्धा मतदार ओळखपत्र असण्याची गरज आहे सांगण्यात आले..
आपल्या जिल्हयात १८ विधानसभा मतदार कार्यालये,७ तहसिलदार व ६ महानगर पालिका,प्रभाग कार्यालयांची ही आपण मदत घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी ०२२-२५३४४१४३ या क्रमांकावर संपर्क करा.