मतदान जनजागृती उत्साहात संपन्न.

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.२७ – मतदार जनजागृती अभियानांतर्गत उरण पनवेल खालापूर या 190 उरण मतदार संघातील वाड्या वस्त्या , रहदारीची ठिकाण , बाजारपेठा , शाळा महाविद्यालयात त्याचप्रमाणे विविध सरकारी आणि खाजगी आस्थापनामधील अधिकारी कर्मचारी यांची पथनाट्याद्वारे तसेच EVM – VVPAT चे प्रात्यक्षिक दाखवून मतदार जनजागृती करण्यात आली.सदर मतदान भितीपोटी , लालसेपोटी न करता सदसद्विवेकबुद्धी वापरून मतदान केलेच पाहिजे. याबाबत गेले दोन महीने सदर मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.

मा. भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नोडल ऑफीसर संतोष पवार तसेच प्रा.दिनेश सासवडे आणि श्री ठाकूर सर यांनी ऊत्तम कामगिरी पार पाडली आहे.या अभियाना दरम्यान स्थानिक नागरीक, जनतेचा या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला.या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने मतदारांमध्ये जणजागृती झाली असून याचा फायदा मतदानाची टक्केवारी वाढण्यात होइलच. शिवाय लोकशाही अधिक बळकट व सुदृढ होईल असे मत नोडल ऑफिसर तथा उरण मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी व्यक्त केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email